Posts

Showing posts from January, 2018

शिवसैनिकांचे "शिवसेनाप्रमुख"

Image
साधारणतः १७-१८ वर्षांपूर्वी मुंबई उपनगरातील भांडुप (पूर्व) येथून आम्ही शिवसैनिकांनी आपल्या विभागात शिवसेनेची उपशाखा असावी या एका ध्येयापोटी प्रयत्न सुरू केले. त्यावेळची मुख्य शिवसेना शाखा क्र. २०८ कांजूरमार्ग येथे होती. परंतु आमच्या विभागापासून फारच दूर असल्याने जनतेला संपर्क साधण्यासाठी खूपच त्रास होत होता. उपशाखेचा ‘मानस’ आम्ही विभागीय नेते आमदार लीलाधरजी डाके, विभागप्रमुख दत्ताराम गुजर आणि शाखाप्रमुख अशोक पावसकर यांच्या कानावर घातला. होय-नाही करता करता रीतसर आदेश मिळाल्यानंतर ‘चॅरिटी शो आणि स्मरणिका प्रकाशन’ हा कार्यक्रम सर्वानुमते आयोजित केला. शाखाप्रमुखांशी समन्वय साधून स्मरणिकेचे प्रकाशन आणि कार्यक्रमास शिवसेनाप्रमुखांनीच यावे ही एकच अट ‘बारा हत्तीचे बळ’ आलेल्या आम्ही शिवसैनिकांनी शाखाप्रमुखांना बोलून दाखवली. शाखाप्रमुखांनीही सर्व शिवसैनिकांच्या समक्ष मातोश्रीला दूरध्वनी केला आणि प्रकाशनाची वेळ ठरविण्यात आली. आणि मग आम्हा शिवसैनिकांना आकाश ठेंगणे झाले. दिवस रात्र धावपळ करून स्मरणिका प्रकाशनासाठीची पूर्तता पूर्ण करून ठरलेल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर २००० रोजी आम्ही सर्व शिवसैनि...